आमच्या बद्दल
सन्मानीय सभासद बंधु- भगिनिंनो,
सर्वप्रथम संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत.
तेहतीस वर्षापुर्वी आदरनीय सुभाषरावजी वाबळेसाहेब व त्यांचे सहकारी (कै) उत्तमराव पाटील, दिलीपरावजी अडगटला, अरविंद बारसे, सुभाषरावजी दैतुले, एच.एम.पाटील, मच्छिंद्र डोंगरे, प्रकाश ठोंबरे कै. विठ्ठलराव वाघ, नंदकुमार बोर्हाडे, कै. प्रकाश ताबोळी व आर.जे सहानी व इतर सहकारी यांनी लावलेल्या रोपटयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. श्री. सुभाषरावजी बासुर, निवृत्त जिल्हा उपनिबंधक व श्री. आर.आर. पवार यांचे संस्था नोंदणीकामी बहुमोल सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे मा. खा. दादा पाटील शेळके यांचे मार्गदर्शनही बहुमोल ठरले. सदर वटवृक्ष यापुढेही जोपासण्यासाठी सर्व संचालक, सभासद व सर्व कर्मचारी वचनबध्द आहोत. संस्थेची प्रगतीची वाटचाल शक्य झाली ती सर्व सभासद व हित चिंतक यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे व प्रेमामुळेच !
पतसंस्था चळचळीचा विचार करता आज पतसंस्था चळवळीसमोर मोठे आव्हान उभे राहिलेले असुन यास स्पर्धात्मक काळात पतसंस्था चालविणे ही तारेवरची कसरत झालेली आहे. एवढया स्पर्धात्मक समस्या असताना देखील राष्ट्रीय वीज कामगार सहकारी परसंस्था मर्या. अहमदनगर या संस्थेने विद्युत क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणुन नावलोकीक कमविलेला आहे.
गेल्या ३३ वर्षाचा आढावा घेता संस्थेने सभासदाचे आर्थिक हित जोपासुन सभासदांकरीता विमा पॉलीसी, सभासदांच्या पाल्यांसाठी प्रोत्साहनपर दरवर्षी बक्षीस योजना, मयत सभासदाच्या वारसास आर्थिक मदत, कर्मचार्यासाठी प्रशिक्षण वर्ग इत्यादी उपक्रम राबविले आहे. अहमदनगरच्या ऐतिहासिक शहरात संस्थेचे मालकीचे माळीवाडा येथे कार्यालय असुन संस्थेचे सुसज्ज व अदययावत “सर्वमंगल सांस्कृतिक भवन” उभारले आहे. संस्थेचे सभासद व निवृत्त सभासदांच्या मुला-मुलीचे लग्नविधी किंवा इतर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सांस्कृतिक भवनामध्ये प्रचलित दराच्या २५ ट्क्के खास सवलत दिली आहे.
संस्थेच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहता संस्थेचे गेल्या ८ वर्षापासुन विज बिल भरणा केंद्र व विज बील वाटप यांच्या उत्पन्नातुन व सभासदांच्या कष्टातुन ह्या सर्वमंगल सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली आहे.
संस्थेच्या दैदिप्यमान यशाबद्द्ल संस्थेचे आदरनिय संस्थापक, संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक सहकारी व कर्मचारी यांचे आभार मानतो
धन्यवाद !
आपला स्नेहांकित
श्री.प्रकाश गायकवाड
जनरल सेकटरी,
राष्ट्रीय वीज कामगार संघटना (इंटक), अहमदनगर.
संस्थेची ठळक वैशिष्टये -
- संस्थेचे अधिकृत वीज बील भरणा केंद्र माळीवाडा, अ.नगर येथे तसेच संस्थेतर्फे अहमदनगर शहरातील वीज बील वितरण सेवा.
- संस्थेचे संपूर्णपणे अद्ययावत संगणकीकरण.
- संस्थेचे दैनंदिन खर्चात कपात.
- सभासदांचे आर्थिक हित जोपासणे.
- संस्थेच्या सर्व सभासदांचा रुपये एक लाखाची जनता अपघात विमा पॉलिसी व वैयक्तीक पॉलिसी रु. पन्नास हजार.
- संस्थेतर्फे मयत सभासदांच्या वारसास संस्थेकडून आर्थिक मदत.
- संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी दरवर्षी प्रोत्साहन पर बक्षिस वाटप.
- संस्थेचे स्वत:च्या मालकीचे शहाराच्या मध्यभागी कार्यालय.
- संस्थेचे सभासद व निवृत्त सभासदांसाठी सुसज्ज सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्ण.