सेवा

सेवा

एन ई एफ टी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर) NEFT

एन एफ टी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर)

या सुविधेव्दारे आपण भारतातील कुठल्याही बॅंकेत, कुठल्याही अकाउंटला पैसे पाठवू शकतो.

या एन ई एफ टी सिस्टीम बद्दल खाली प्रश्न स्वरूपात सविस्तर माहिती दिलेली आहे.:

  • एन एफ टी सिस्टीम काय आहे?

-नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर ही एक पैसे पाठविण्याची सुविधा आहे ज्या व्दारे आपण भारतातीलकुठल्याही बॅंक शाखेतून, कुठल्याही बॅंक शाखेत पैसे पाठवू शकतो. सेंट्रलाईज अकाऊंटींग प्रणालीचा वापरकरून बॅंक अकाऊंट मध्ये पैसे स्विकारणे अथवा पैसे पाठविण्यासंदर्भातील सुचना एकाच केंद्रातून कार्यान्वितकेल्या जातात.

  • एन एफ टी केल्यानंतर लाभार्थीला पैसे केव्हा मिळतात?

लाभार्थीला त्याच दिवशी अथवा दुस-या दिवशी त्याच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा होतात सदरील लागणारा कालावधी हा सेटलमेंट च्या कालावधीवर अवलंबून असतो.

  • एन एफ टी साठी कोणती प्रार्थमिक माहिती लागते?

एन ई एफ टी करण्यासाठी खालील माहिती द्यावी लागते

– लाभार्थीचे बॅंक अकाऊंटचे नाव व बॅंक अकाऊंट नंबर

– बॅंकेचे नाव व त्या बॅंक शाखेचा आय एफ एस कोड

रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम (आर.टी.जी.एस) - RTGS

  • आर टी जी एस व्दारे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम दोन तासांत आपण भारतात कोणत्याही बॅंकेत कोणत्याही अकाऊंटला पैसे पाठविता येतात.
  • आर टी जी एस ने पैसे पाठविण्यासाठी रकमेची कुठलीही मर्यादा नसते.
  • या आर टी जी एस सिस्टीम बद्दल खाली प्रश्न स्वरूपात सविस्तर माहिती दिलेली आहे
  • आर टी जी एस प्रणाली काय आहे?

-आर टी जी एस म्हणजे रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. आर टी जी एस व्दारे पाठविलेली रक्कम लवकरात लवकर एका शाखेतून दुस-या शाखेत पाठविला जातो. पाठविलेल्या पैशासाठी प्रतिक्षा काळ नसतो सदरील रक्कम व्यवहाराची पुष्टी झाल्यानंतर तात्काळ जमा केली जाते. पाठविलेले पैशाचे व्यवहार यामध्ये रद्द होऊ शकत नाही कारण हे व्यवहार रिझर्व बॅंकव्दारे होतात.

  • आर टी जी एस व्यवहारासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त रकमेची मर्यादा असते का?

आर टी जी एस व्यवहार हे मोठ्या रकमांसाठीच असतात यामध्ये कमीत कमी रकमेची मर्यादा 1 लाख रूपये असते व जास्तीत जास्त रकमेची कोणतीच मर्यादा नसते.

  • आर टी जी एस व्यवहारासाठी कोणती प्रार्थमिक माहीती द्यावी लागते?

आर टी जी एस व्यवहारासाठी बॅंकेस खालील प्रकारची प्रार्थमिक माहिती द्यावी लागते

– किती रक्कम पाठवावयाची आहे

– ज्या खात्यातूनरक्कम पाठवावयाची आहे ते बॅंक खाते नंबर

– ज्या लाभार्थ्याला रक्कम पाठवावयाची आहे त्या लाभार्थ्याच्या बॅंकेचे नाव

– ज्या लाभार्थ्याला रक्कम पाठवावयाची आहे त्या लाभार्थ्याचे नाव

– ज्या लाभार्थ्याला रक्कम पाठवावयाची आहे त्या लाभार्थ्याचा बॅंक अकाऊंट नंबर

– पाठविणा-या रकमेच्या व्यवहाराविषयी माहीती, जर असेल तर

– लाभार्थ्याच्या बॅंकेचा आय एफ एस कोड

कर्जांवरील व्याजदर

साधे कर्ज – १२%

१०० हप्ते परत फेड


शैक्षणिक कर्ज – १२%

२० हप्ते परत फेड


 तातडी कर्ज – १२%

२० हप्ते परत फेड